गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शेतकरीविरोधी राज्य सरकार म्हणत काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

- Advertisement -

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शेतकरीविरोधी राज्य सरकार म्हणत काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) – हे सरकार शेतकरी विरोधी आहे, दिवसा ढवळ्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते आहे. त्यांचे खून, अल्पवयीन धनदांडग्यांकडून हिट अँड रन च्या घटना घडत असताना राज्याचे गृह खाते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे त्यामुळे  अशा शेतकरी विरोधी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक करून आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेतेमंडळी मोठ्या संख्येने गोळा झाले होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा येथील नेते घनश्याम शेलार, पाथर्डी तालुकाध्यक्ष नाजीरभाई शेख, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहकले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील , शेवगाव तालुकाध्यक्ष समीरभाई काझी, नगर तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संजय आनंदकर सर, उत्तमराव नागवडे, संपतराव म्हस्के, डॉ. अमोल फडके, शरद पवार , कोकाटे सर, अंजुम शेख , किशोर तापकीर, तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आला.

यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की , प्रचलित राजकीय पक्षांची तोडफोड करून बनवलेल्या राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याची पुरती वाट लावली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. शेकतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कांदा दूध दरवाढीचे प्रश्न प्रलंबित आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. विद्यार्थीं वर्ग शेतकरी यांचे हाल चालू आहेत.

 

रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्र खड्ड्यात आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह  हिट अँड रन केसेस मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातील गुन्हेगारांना सोडून देण्याच्या सूचना राज्य सरकार देते आहे. पोलिस भरती चिखलामधे घेतली जाते, नीट चे पेपर फुटतात व त्याचे धागेदोरे गुजराथमधे लागतात अशा अनेक घटनांनी हा देश संकटात सापडलेला आहे.

 

त्यामुळे काँग्रेस नेतृत्व राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण  हे चिखलफेक आंदोलन केलेले आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आम्ही सर्वानी सरकारचा निषेध करून सरकारचे प्रतीक असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेवर आम्ही चिखल फासलेला आहे.

यावेळी घनश्याम शेलार म्हणाले की , शेतकऱ्याला एकाही विषयात या राज्यात सुख मिळालेले नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. राज्यात एम पी एस सी च्या परीक्षा होत नाहीत.

 

इतर स्पर्धा परीक्षा घेतल्या त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी पेपर फोडले. समाजातला कोणताच घटक या कालखंडात सुखी नाही त्यामुळे गुन्हेगारी भ्रष्ट्राचार यांचा जनक असलेल्या भाजपा सरकारचा आम्ही निषेध करतो . हे भ्रष्ट राज्यसरकार पायउतार होऊ पर्यंत आम्ही शांत बसणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेऊ.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles