ज्ञानसाधना गुरुकुलच्या बालवारकऱ्यांची केडगाव देवी ते आरणगाव पायी वारी

- Advertisement -

वारकरी संप्रदायची परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करते -मनोज कोतकर.


एक हजारच्या पुढे बालवारकरी दिंडीत सहभागी

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे आकर्षक म्हणजे एक हजारच्या पुढे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. ही दिंडी केडगाव मधील बालवारकऱ्यांचा सर्वात मोठा सोहळा ठरला.


या पायी दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी, संत तुकाराम महाराज, मीराबाई, मुक्ताबाई यांची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधले. तर सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत सहभागी झाले होते. केडगाव पासून आरणगाव येथील प्रती पंढरपूर समजले जाणारे विठ्ठलाचे मंदिर असे पायी दिंडीचे नियोजन होते. या पायी दिंडीचे केडगाव देवी मंदिरासमोर नगरसेवक मनोज कोतकर व परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.


नगरसेवक कोतकर म्हणाले की, वारकरी संप्रदायची असलेली परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे. या बाल वारकऱ्यांकडे पाहून केडगाव हे प्रति पंढरपूर असल्याचे वाटू लागले. विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमांच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपसण्याचे कार्य चांगल्या पध्दतीने होत असल्याचे सांगून त्यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.


उद्योजक जालिंदर कोतकर म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे ज्ञानसाधना गुरुकुलचे सर्व विद्यार्थी पायी विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. यावर्षी देखील सर्व बालवारकरी टाळ-मृदूंगाच्या गजरात हरीनामाचा जप करत वारीत सहभागी झाले. या धार्मिक उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.


मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले की,शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे. मुलांना शिक्षण देत असताना, संस्कार देणे सध्याच्या काळाची गरज बनली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमातून ज्ञानसाधना मुलांना सतत संस्कार देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पायी दिंडीसाठी जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप, साई सेवा महिला मंडळ, मनोज कोतकर मित्र मंडळ, केडगाव बास्केट बॉल क्लब, बच्चन कोतकर, अजित कोतकर, संचालक भैरू कोतकर, रामदास ढवळे, अमित ढोरसकर, जगन्नाथ चेमटे, नवनाथ कोतकर, छबुराव कोतकर यांनी मुलांना फराळाचे वाटप करुन पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच कोतकर, ठुबे, ढवळे, क्षीरसागर, सुंबे, साई सेवा मंडळ यांनी दिंडीचे रांगोळी व पूजा करून स्वागत केले.


दिंडीसाठी रोहिणी ढोरसकर, पूजा ढोरसकर, सविता चेमटे, प्रतीक्षा चिमटे, मंदाकिनी चेमटे, रेणुका शिंदे, सविता शिंदे, वैशाली गवळी, मनीषा चेमटे, सीताबाई भस्मे, खेतमाळस, अनिता ठुबे, रोहिणी ठुबे, कल्याणी ठुबे, रुपाली ठुबे, दिपाली ठुबे, ऋतुजा ठुबे, स्वाती ठुबे, नंदा कोतकर यांचे सहकार्य लाभले.


या कार्यक्रमासाठी दत्तात्रय चेमटे, प्रशांत वारकड, संदीप कोतकर, नितीन ठुबे, अमोल कोतकर, गुलाब कोतकर, कैलास ठुबे, किरण खांदवे, शिक्षक शाहरुख शेख, रुचिता जमदाडे, शबाना शेख, कोमल शिंदे, प्रतिभा फुलारी, सुवर्णा दाणी, गीता रणखांब, संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, लंडन किड्सचे सर्व शिक्षक, सहकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles