अहमदनगर प्रतिनिधी – समीर मन्यार
स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी केशव खानदेशे होते.
यावेळी इंजिनियर नूरआलम शेख, शिवाजीराव ससे, ज्ञानेश्वर कविटकर, मीरा महाजनी, नानासाहेब दळवी, दत्तात्रय फुलसौंदर, श्रीकृष्ण लांडगे, अॅड. विजय लुणे, अशोक आगरकर, उषा फिरोदिया, बाळकृष्ण पात्रे, श्रीकांत मांढरे, मोहन लुल्ला यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते. सभा घेण्यासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल संघाच्या वतीने यावेळी श्री. बाबासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. केशव खानदेशी म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना होऊन १७ वर्षे पूर्ण झाली असून, १८ व्या वर्षात पदापर्ण करीत आहोत. सभासदांची संख्या २६२ आहे. पुरुष १६८ व महिला ९४ आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक दर महिन्याच्या दुसर्या व चौथ्या रविवारी होते. यात विचारांची देवाणघेवाण होऊन एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेतली जातात. शेवटच्या रविवारी ज्येष्ठांच्या सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातात. संघात महिला सभासदांची संख्या वाढते आहे. महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेणार आहोत. सर्व सभासदांमध्ये सामंजस्याचे व आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक बांधिलकी जपत संघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. परिसर स्वच्छतेकडे आम्ही नेहमीच विशेष लक्ष दिले आहे. ज्येष्ठांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम संघाच्या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सभासदांनी मनोगत व्यक्त केले. संघाच्या दिवंगत सदस्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार श्रीकृष्ण लांडगे यांनी मानले.