जीव मुठीत धरून नागरिक करतात प्रवास महामार्गावर वाढले अपघाताचे प्रमाण
येत्या शुक्रवारी सीना नदी पुलावर नागरिकांन समवेत छेडणार आंदोलन – नगरसेवक सचिन शिंदे
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
कल्याण रोड हा राष्ट्रीय महामार्ग नसून हा नागरिकांचा जीव घेणारा महामार्ग आहे. ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या रस्त्या सारखा हा महामार्ग झाला आहे.शिवाजीनगर उड्डाणपूल नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंतच्या कल्याण रोड महामार्गाची दुर्दशा झाली आहे. सदरच्या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये गुडघ्या एवढे खड्डे झाले असून या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते या खड्ड्यांमुळे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होतात यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. आता या सर्वत्र रस्त्यांवर चिखल व खडीचे साम्राज्य झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वार पडत आहे.या रस्त्यांचे खड्ड्यांचे पँचिंग किंवा सिंगल कार्पेट करणे गरजेचे आहे.येत्या चार दिवसात या कामास सुरुवात न झाल्यास शुक्रवारी दि.17 सप्टेंबर रोजी कल्याण रोडवरील सीना नदी पुलावर रस्ता रोको करून नागरिकांसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिला. तरी नागरिकांच्या व आमच्या मागणीचा विचार करावा व रस्त्याच्या पॅचिंगचे काम लवकरात-लवकर सुरू करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्गाकडे नगरसेवक शिंदे यांनी दिले आहे.