ॲड.युवराज शिंदे व अनुसया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने सी.सी.टी.व्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा संपन्न

- Advertisement -

कल्याण रोड वरील अनुसया नगर परिसर सुरक्षित व शांततामय राहण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेराची गरज – आ.संग्राम जगताप

शहरांमध्ये ठीक-ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम पथदर्शी

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास सुरक्षतेच्या बाबतीत उपयोगी ठरू शकतो तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती व सामाजिक सुरक्षितेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा आहे. यासाठी संस्थांनी व नागरिकांनी पुढे येऊन नगर शहर हे सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली व्हावे यासाठी सर्व नगरकरांना आव्हान केले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत ॲड.युवराज शिंदे व अनुसया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य त्यांनी पार पाडले आहे.सामाजिक सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणा काम करत आहे,परंतु त्यास नागरिकांचाही सहभाग असणे गरजेचे आहे.सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास आपले शहर सुरक्षित व शांततामय राहण्यास मदत होईल,तसेच असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

ॲड.युवराज शिंदे व अनुसया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ॲड.युवराज शिंदे,लक्ष्‍मण खोडदे,मच्छिंद्र साळवे,संभाजी चौधरी, शिवाजी शिंदे, महेंद्र मैड,भारत जावळे, सचिन हरबा,पोपट चव्हाण,सुधाकर बोल्ली, अमरसिंग परदेशी, कुंडलिक आरबडे,सर्जेराव भापकर, अकबर मनियार,मेजर रसाळ आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड.युवराज शिंदे म्हणले की,आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रोड वरील अनुसया नगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या भागाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. अनुसया नगर मधील नागरिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरीक सुरक्षित राहतील व या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक राहण्यास मदत होईल, मंगळसूत्र ओढण्याच्या घटना,महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, दुचाकी चोरी तसेच अपघात या सर्व घटनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहिल्यास गुन्हेगारांवर मोठा आळा बसून गुन्हे घडणार नाही असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles