आतंकवादाचा राजकीय हत्यार म्हणुन प्रयोग करणार्या जिहादी पाकीस्तानवर अंकुश लावण्याकरिता विश्वसमुदायाने पुढे यावे – विवेक कुलकर्णी
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्र सरकार कडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.जिहादी आतंकवादाचा पूर्णत: विनाश करण्याकरिता पाकिस्तानला “न भूतो न भविष्यती”असे उत्तर द्यावे.तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.
हिंदूंच्या काश्मीर घाटीत पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे.हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या नृशंस हत्यांमुळे आहत झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दि.९आँक्टोबर २०२१ रोजी देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत.
भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या,भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी.भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे.
जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे.आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे.आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्या करिता विश्व समुदायाने पुढे यावे.अशी मागणी बजरंग दलाचे क्षेञीय सह संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केली.
दिल्लीगेट येथे विश्व हिंदु परिषद,बजरंग दला तर्फे पाकीस्तानचा निषेध करुन जिहादी आतंकवादाचा तीव्र निषेध करण्यात आला.याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड.जय भोसले,मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,बजरंगदलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी,सतिश सायंबर, दिग्विजय बसापुरे,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते.
बलिदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे.त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
भारताच्या हातूनच इस्लामिक जिहादी आतंकवादाचा समूळ नायनाट होईल व तो होईपर्यत आम्ही शांत बसणार नाही.असा ईशारा बजरंग दलाचे क्षेञीय सह संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला.