प्रवाशांची होतेय गैरसोय,बस सुरु करण्याची मागणी
अंमळनेर प्रतिनिधी – सुनील आढाव
ग्रामीण भागातून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अद्यापही बंदच असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागले आहे तर गावखेड्यातुन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे यामुळे ग्रामीण भागातून धावणाऱ्या पुर्वीच्या सुरु असलेल्या बसेस सुरु करण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यां मधुन करण्यात येत आहे.
आष्टी आगाराची नगर अंमळनेर मुक्कामी बस ,सकाळची आष्टी रायमोह आष्टी,आष्टी अंमळनेर आष्टी ,दुपारची आष्टी रायमोह आष्टी,तर जामखेड आगाराची जामखेड शिरुर मुक्कामी,जामखेड अंमळनेर,पाथर्डी, शेवगाव पैठण मुक्कामी ,पाटोदा आगाराची पाटोदा पुणे ,पाटोदा पिंपळनेर मुक्कामी ,बीड अंमळनेर मुक्कामी ,पाथर्डी आगाराची पाथर्डी जामखेड पाथर्डी ,पाथर्डी करमाळा मुक्कामी ,कोपरगाव आगाराची कोपरगाव डोंगरकिंन्ही मुक्कामी अशा बसेस अद्यापही बंदच असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
वरिल आगाराच्या सर्वच बस या अंमळनेर मार्गेच धावतात या सर्वच बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद देखील मिळत होता परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळात या सर्वच बस राज्य परिवहन महामंडळाने बंद केलेल्या होत्या परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्यामुळे या बंद करण्यात आलेल्या बस परत सुरु करण्याची मागणी होत आहे.
अंमळनेर मधुन धावणाऱ्या आष्टी,पाटोदा,जामखेड,धारुर, पाथर्डी,कोपरगाव,आगाराच्या पुर्वी सुरु असलेल्या बस बंद आहेत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बसच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.