नगर शहरात जीवा सेना संघटनेतर्फे जयंती साजरी

- Advertisement -

वीर जीवाजी महाले यांचे गुण स्वत:मध्ये आत्मसात करणे काळाची गरज – योगेश पिंपळे

 

अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते

शिवरत्न वीर जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक होते.आपल्या राजावर निष्ठा कशी असते हे त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून दाखवून दिले.तेव्हा ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण कायमची रुढ झाली. शिवरत्न वीर जीवाजी महाले यांनी वडिलांकडून पहिलवानाचे धडे घेत दांडपट्टा,चालवण्याचे शिक्षण घेऊन तरबेज झाले.त्यांच्या गुणांचे आज प्रत्येकाने आत्मसात करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन जीवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे यांनी केले.

नगर-मनमाड रोडवरील शिवरत्न जिवाजी महाले चौकातील फलकास जीवा सेना संघटनेच्यवतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री.पिंपळे बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुनिल त्र्यंबके, उद्योजक बबलू सूर्यवंशी, सागर मेट्टू, जीवा सेनेचे उपाध्यक्ष आशिष ताकपिरे, संघटक रमेश बिडवे, दादासाहेब पंडित, रामेश्वर पंडित,महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, उपाध्यक्षा स्वाती पवळे,सचिव कांचन बिडवे आदि उपस्थित होते.

श्री.पिंपळे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविताना दांडपट्टयाचा उपयोग जीवाजी महाले यांनी योग्य प्रकारे केला.सैय्यद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हा जीवा महालेंनी दांडपट्टा काढून त्याला पालथा पाडला व राजेची सुटका केली. हा इतिहास विसरता कामा नये,असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले,निष्ठावन सैनिक कसा असतो हे जीवाजी महाले यांच्याकार्यातून दिसून येते. आपला जीव धोक्यात घालून राजेंचे प्राण वाचविले, त्यामुळेच अशा वीराची समाधी आपणा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहील,असे सांगून  जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची गाथा थोडक्यात स्पष्ट केली.

यावेळी बबलू सूर्यवंशी, रमेश बिडवे यांनी जीवाजी महाले यांच्या पराक्रमाची माहिती दिली.या चौकाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जिवाजी महाले चौक ओळखला जात आहे,असे बिडवे म्हणाले.

शेवटी आशिष ताकपिरे यांनी आभार मानले.याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

Click to scroll the page