श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने सौरभ बोरा यांचा सत्कार

- Advertisement -

विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा

अहमदनगर प्रतिनिधी – भारतातील देवस्थाने येथील जनतेची प्रेरणास्थाने आहेत.प्रत्येक शहरातील,गावातील ग्रामदैवत हे तेथील भविकांचे श्रद्धास्थान असते.

त्याचबरोबर देशातील तिरुपती व नगरमधील शिर्डी देवस्थानची प्रचिती जगभर पसरली आहे.या देवस्थानच्या माध्यमातून भाविकांच्या मनोकामना पुर्ण होत असतात, त्याचबरोबर देवस्थानही भाविकांसह नागरिकांना सेवा देत आहे.या मोठ-मोठ्या देवस्थानच्या माध्यमातून देशभरात धर्मशाळा,हॉस्पिटल,अन्नछत्र,शैक्षणिक मदत दिली जावून मानवसेवा करण्यात येत आहे.

आपली देशातील महत्वाच्या तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी झालेली निवड ही ग्रामदैवत श्री विशाल गणेश व श्री बालाजीचे आशिर्वाद आहेत.या पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे.तिरुपती देवस्थानच्यावतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील,असे प्रतिपादन उद्योजक सौरभ बोरा यांनी केले.

उद्योजक सौरभ बोरा यांची तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे,पुजारी संगमनाथ महाराज,पांडूरंग नन्नवरे,चंद्रकांत फुलारी,रंगनाथ फुलसौंदर,गणेश राऊत आदि उपस्थित होते.

याप्रसंगी पंडितराव खरपुडे म्हणाले,श्री विशाल गणेश मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार झालेला असून,आता कलाकुसरीने नटलेले हे मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.सौरभ बोरा यांची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी झालेली निवड ही नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.या माध्यमातून भाविकांना चांगल्या सुविधा मिळून मंदिरांच्या विकासास चालना मिळेल,असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत फुलारी यांनी केले तर आभार पांडूरंग नन्नवरे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles