जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचे काम देवदूतासारखे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

जिल्हा रुग्णालयाने कोविड काळामध्ये उत्कृष्ट अशी आरोग्यसेवा देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम केले.कोविडचा काळ सुरू असल्यामुळे बाह्यरुग्ण विभाग बंद होता.आता सदर विभाग सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही बाह्य विभाग टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येत आहे.यामध्ये आज डोळ्यांची शस्त्रक्रिया विभाग सुरू होऊन जिल्ह्यातील 26 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

माझ्या निधीतून डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी या रुग्णांना येण्या-जाण्यासाठी 25 सीटची वातानुकूलित आरोग्यसेवेची बस उपलब्ध करून दिल्याचा मला आनंद आहे.आज खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली, सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय हे आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचे केंद्र बिंदू आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचार्‍यांचे काम देवदूता सारखे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून नेत्र शस्त्रक्रिया साठी जिल्हाभरातील रुग्णांना जाण्या-येण्याची साठी 25 सीटची वातानुकूलित रुग्णवाहिका बससेवेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा,डॉ.मनोज घुगे,प्रा.माणिकराव विधाते,संतोष ढाकणे,साहेबाना जाहगिरदार,डॉ.मंगेश राऊत,डॉ.अजिता गरुड यांसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा म्हणाले की,आ.संग्राम जगताप यांनी बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा यासाठी पत्रव्यवहार केला होता त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुरू केले आहे.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज 26 रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली त्या रुग्णांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले व 25 सीटची वातानुकूलित रुग्णवाहिका बस उपलब्ध करून दिली आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य मंदिरापर्यंत पोहोचविण्याचे काम झाले आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles