अमरापूर प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यात दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेवगाव मिरी रस्त्यावरील सामनगाव जवळील पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते,विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिला भगिनींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असत.
तर येथे काहींचे अपघात झाल्याने सामनगाव येथील माझ्यासह संदीप सातपुते,सरपंच सौ राणी संजय खरड,अनिल म्हस्के तसेच मळेगाव येथील शिवाजीराव भिसे आदी कार्यकर्त्यांनी येथे पुलाची मागणी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे केली.
पुलाचे काम करण्याचे मान्य केले व सध्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे तातडीने पाठपुरावा करून येथे पाईप टाकून भराव करण्याचे काम तातडीने सुरु केल्याचे विजय कापरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, विजय कापरे, संजय खरड, अनिल म्हस्के, जनार्धन वाढेंकर, अनंता उर्किडे, महादेव पाटेकर, आकाश साबळे, प्रदीप पाटेकर, उपसरपंच ज्ञानेश्वर कराड, कानिफ उर्किडे, सा.बा. विभागाचे घुले तात्या, ठेकेदार निलेश रोकडे, भगवान कापरे, उमेश कापरे, मयूर म्हस्के, लक्ष्मण जाधव, पांडूरंग खरड, सोमनाथ सातपुते, राजेंद्र काते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना बापूसाहेब पाटेकर म्हणाले सर्वच छोट्या मोठ्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम करणे हा आमच्या पक्षाची किंवा आमदारांची पद्धत नाही,परंतु आमदारांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळालेले शासनाचे कामाचा कोणीतरी येऊन शुभारंभ करणे व आम्हीच कामे करतो असा लोकांचा संभ्रम करणे असे प्रकार आलीकडे सुरु झाले आहेत.
या प्रकारचे राजकारण स्व.राजीव राजळे,आमदार मोनिकाताई राजळे अथवा आमच्या पक्षाकडून झाले नाही व होणारही नाही,विकास कामे होणे आवश्यक आहे परंतु यात श्रेयवाद आणू नये व विरोधाकाकडून चुकीचा पायंडा पडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ वांढेकर यांनी केले.