मनपाच्या ढिसाळ कारभारावर आ.संग्राम जगताप संतापले

- Advertisement -

महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी झाले सयाजीराव

अहमदनगर प्रतिनिधी – आयुक्त शंकर गोरे,उपायुक्त यशवंत डांगे व सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या ए.सी केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यात व्यस्त आहे. परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे मनपाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहे हे सर्व अधिकारी व कर्मचारी स्वतः सयाजीराव झाले आहे असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील विविध नागरी समस्यांची पाहणी करताना केला.

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वत्र अनधिकृत पार्किंग,अस्वच्छता, ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग, विद्युत पोलवर जाहिरातींचे अनधिकृत फलके, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असताना ही मनपाचे अधिकारी व कर्मचारी कुठल्याही प्रकारचे चांगले काम करत नाही व नगर शहरातील जनतेसाठी कुठलेही चांगले काम करताना दिसत नाही.यापुढील काळात जो अधिकारी कामचुकारपणा करेन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी असा इशारा मनपा आयुक्तांना दिला.

अहमदनगर शहर स्वच्छ,सुंदर,हरित राहण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु अधिकारीवर्ग फक्त आपल्या एसी केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यातच व्यस्त आहे तर ठेकेदारांच्या बैठका करण्यात देखील व्यस्त आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नाही असा आरोप पाहणी करताना आमदार संग्राम जगताप यांनी केला.

यापुढील काळात नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावा अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक कुमार सिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे,अभिजित खोसे, संतोष ढाकणे तसेच आदी ल यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles