अहमदनगर प्रतिनिधी –
नगर तालुक्यातील जखणगाव मध्ये दि. १६ जुलै रोजी रात्री घरफोडी करण्यात आली होती. त्यावेळी बंद घरातून चार शेळ्या चोरून नेल्या होत्या.या चोरीबाबत नगर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०२१ भा. द. वि, क,४५७,३८०, प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच याविषयी गोपनीय माहिती वरून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथकासोबत कोम्बिंग ऑपरेशन राबवून नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथून सराईत गुन्हेगार हर्षल काळे यास अटक करण्यात आली आहे.
जखणगाव येथील शेळी चोरीतील आरोपी अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. या सराईत गुन्हेगारावर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे ही दोन गुन्हे दाखल आहेत.बेलवंडी पोलिस स्टेशन व दौंड पोलीस स्टेशन येथे प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप,पो.स. ई.धनराज जारवाल, सफौ/ लबडे,इथापे,पो.हे.कॉ./ धुमाळ,लगड,सरोदे,पो.ना/ योगेश ठाणगे,पो.ना.धर्मराज दहीफळे, पो.कॉ. जयदत्त बांगर,श्याम घावटे, चापोहेकॉ/काळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली असून पुढील तपास सुरू आहे.