माळीवाड्यातील ब्लॅकमेलर नगरसेवकावर कायदेशीर कारवाई करावी मनपा आयुक्तांकडे पैलवान प्रतिष्ठानची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
गेले दोन वर्षापासून संपूर्ण देशभर कोरोणाचे महाभयंकर संकट नागरिकांवर ओढवले आहे.या संसर्गजन्य विषाणूमुळे अनेक नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू होऊन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी केंद्र सरकारने कोरोणा प्रतिबंधक लस काढून नागरिकांना लस देण्याचे काम सुरु केले आहे.
नागरिकांनीही कोरोणाचे नियम पाळून रांगेत उभा राहून कोरणा प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणात घेतली.काही नागरिकांमध्ये लस संदर्भात समज गैरसमज निर्माण असल्यामुळे ते प्रतिबंधक लस घेत नाही.
काही नागरिकांना आपल्या विविध कामासाठी लसीकरण झालेल्या प्रमाणपत्राची गरज भासत आहे.केंद्र व राज्य सरकार लसीकरणासाठी हजारो कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांचे आरोग्य कोरोना पासून सुरक्षित राहावे यासाठी उपाययोजना करत आहे.
परंतु माळीवाड्यातील ब्लॅकमेलर नगरसेवक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र लस न घेता अनाधिकृतपणे देण्याचे काम सर्रास पणे सुरू आहे.त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम हा ब्लॅकमेलर नगरसेवक करत आहे.
याच बरोबर आशा व्यक्तींपासून देशाची फसवणूक सुरू आहे.तरी अशा व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करावी.अन्यथा पहिलवान प्रतिष्ठान अशा ब्लॅकमेलर नगरसेवकाला धडा शिकवेल अशी मागणी उपायुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे केली.
यावेळी पै.ओंकार घोलप व पैलवान प्रतिष्ठान चे सर्व सदस्य उपस्थित होते.