माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
नगर प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चौथ्या मजल्यावर… कार्यालयाला लागलेल्या आगीत काही भाग जळून खाक झाला.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर तातडीने महापालिका व एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यामुळे आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आज विझवण्यासाठी स्वत मैदानात उतरले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यां बरोबर खांद्याला खांदा लावून शिवाजी कर्डिले यांनी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
आगी संदर्भात संशय बळावतोय
जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगी संदर्भात संशय बळावत असून याची सखोल चौकशी करून दोषीं आढळल्यास कारवाई केली जाईल असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी घटनास्थळी व्यक्त केले.