जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
देशसेवा करताना पप्पांना वीरमरण आले त्यांच्याप्रमाणेच आम्ही देशसेवा करणार असल्याचे अवघ्या नऊ वर्षांची ज्ञानेश्वरी व सहा वर्षांची अनुश्री हिने निर्धार व्यक्त केला. तर वडील कृष्णाजी भोसले यांनी माझा मुलगा देशसेवेसाठी शहीद झाला याचा मला अभिमान असल्याचे सांगून देशप्रेम व्यक्त केले.
जामखेडचे सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान गणेश भोसले हे गडचिरोली येथे कर्तव्य बजावत मंगळवारी मध्यरात्री वीरमरण आले.याबाबत गडचिरोली येथून शहीद जवान यांचा मृतदेह जामखेड येथे गुरुवारी साडेबारा वाजता आणला यानंतर शहिद जवान गणेश भोसले यांची रथातून अंत्ययत्रा अमरधाम येथे काढून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद जवान गणेश भोसले यांच्या दोन मुली ज्ञानेश्वरी इयत्ता तिसरी व अनुश्री इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहेत.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही पप्पासारखे देशसेवा करणार असल्याचे सांगितले.
वडिल कृष्णाजी भोसले म्हणाले की मला जर अजुन दोन मुले असते तर मी सैन्यदलात भरती केले असते . देशासाठी बलिदान केले असते अशी बोलकी प्रतिक्रिया अंगावर शयारे अणणारी वडिल कृष्णाजी भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे ; पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड ; भाऊ मयुर भोसले यांनी आपल्या श्रध्दांजली पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.