अहमदनगर
राज्यात आगामी काळात खाजगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मूळ पशुवैद्यकीय विद्यापीठांच्या नियमात बदल करणार असल्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले .अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानात एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते त्यावेळी त्यांनी हे सांगितले .राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ठराविक महाविद्यालये होती. मात्र कृषी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यानंतर खाजगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालय सुरू झाली.त्याच धर्तीवर राज्यातील पशुसंवर्धन विद्यापीठातील कायद्यामध्ये बदल केला जाणार असून त्यानंतर खाजगी तत्वावर पशुसंवर्धन महाविद्यालयांना परवानगी देण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले .