आष्टी प्रतिनिधी – सुरुडी (ता.आष्टी) गावाला वीज पुरवठा करणारा ट्रांसफार्मर (डेपी) नादुरुस्त झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यातली त्यात १० वी आणि १२ वी च्या सध्या परीक्षा सुरू आहेत.विद्यार्थ्यांना देखील या समस्यांला तोंड द्यावे लागत आहे.दुरुस्ती बाबत नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असताना विविध कारणे सांगत वीज वितरण कार्यालय दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे.
१५ दिवसांपासून गाव अंधारात असलेल्यांने येथील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गावातील राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी आणि गावातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे काही नागरिकांतून सूर उमटत आहेत.