फुलचंद नागटिळक(प्रती गाडगेबाबा) यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरव
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
नगर-सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव येथील प्रति गाडगेबाबा फुलचंद नागटिळक हे पुरस्कार घेण्यासाठी आले. माऊली संकुल येथे हातात झाडू घेऊन साफसफाई केली.हे सर्व पाहून आलेले मान्यवर थक्क होऊन गेले.
खरोखरच हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला आहे.असे सर्वांना वाटले.फक्त गाडगे बाबांची वेशभूषा नाही तर कृतीतून कार्य करावे.त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालावा यासाठी फुलचंद नागटिळक यांनी प्रबोधनकार संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करून समाज जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
सावेडी येथील माऊली संकुल येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने(महाराष्ट्र राज्य)सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराव येथील समाजसेवक फुलचंद नागटिळक यांना राज्यस्तरीय “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सेवा संघाचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक बाबासाहेब पावसे,प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार,हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, समाजसेवक यादवराव पावसे, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे,संघटक रविंद्र पवार,समन्वयक श्रीराम शिंदे,विश्वस्त सौ.सुजाता कासार आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.