ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभागाच्यावतीने चास परिसरात वृक्षारोपण

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – आज काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब जागतिक स्तरावरही चिंतेची ठरत आहे. त्यामुळे सर्वच देश आता निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत. या कार्यात आपणही सक्रिय सहभाग देऊन येणार्‍या पिढीसाठी चांगले वातावरण निर्माण केले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठान नेहमीच शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही कार्य करत आहे. निसर्ग संवर्धनासाठी वन विभागाच्या सहकार्याने आमची संस्थाही पुढाकार घेत आहे, या उपक्रमात युवकांनाही सहभागी करुन त्यांनाही वृक्ष संवर्धनाचे महत्व कृतीतून पटवून देण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन ज्ञानदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे यांनी केले.

     ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभाग यांच्यावतीने चास व निमगाव वाघा  परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे, संदिप दळवी, वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल थेटे, वनपाल अनिल गावडे, वनरक्षक रामचंद्र अडागळे, नगरसेवक अमोल कोतकर, विजय पठारे, सागर बोरुडे, संग्राम कोतकर, डॉ.पद्माकर रासवे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुनिल थेटे म्हणाले, शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असते. या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था, नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होत आहे. ज्ञानदा प्रतिष्ठानचा वृक्षारोपणातील सहभाग हा इतरांसाठी प्रेरणादायी राहील. झालेल्या वृक्षारोपणामुळे या गावातील निसर्ग संपदा बहरेल, असे सांगितले.

     यावेळी वनपाल अनिल गावडे, नगरसेवक अमोल कोतकर आदिंनी आपल्या मनोगतातून वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन डॉ.पद्माकर रासवे यांनी केले तर रामचंद्र अडागळे यांनी आभार मानले. या उपक्रमात अमोल जाधव, शिवाजी पठारे, ज्ञानेश्वर बर्वे, सचिन सोनुले, स्वप्नील गवळी, विश्वास चेडे, मिनीनाथ पादीर, शेखर पुंड, वैभव भोंग, टच फौंडेशनचे अध्यक्ष गौतम मुनोत, महेश ससे, आशिष शहाणे, विक्रात ठुबे, धनंजय पलघडमल, सचिन गाडेकर, कपिल पाटील, महेश भवर, गणेश राऊत, प्रविण देवकर, अनिल इंगोले, विनोद शेळके, रविंद्र फुलसौंदर, महेश करपे, निखिल भळगट, कोमल भळगट, प्रविण कोतकर, पै.नाना डोंगरे, विश्वास बीज ग्रुपचे जगदीश शिंदे आदिंसह चास व निमगांव परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी टच फौंडेशनचे सहकार्य लाभले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles