दसरा व दिवाळीसणा निमित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने “मागेल त्याला दाळ” योजनेतंर्गत ६०/- रुपये प्रति किलो दराने हरभरा दाळ मिळणार.. – सुवेंद्र दिलीप गांधी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य
अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) – दिपक कासवा
लोकप्रिय पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त “मागेल त्याला दाळ” योजनेतंर्गत भाजप – शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६०/- रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो दाळ मिळणार आहे.
सर्वसामान्यांना दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.ही दाळ भाजप – शिवसेनेच्या सर्व कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे.
अहिल्यादेवीनगर शहरातील भाजप -शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांना “मागेल तेथे डाळ” विक्री केंद्र प्रत्येक वार्डमध्ये सुरू करून देण्यात येणार आहे. जेणे करून नागरिकांना याचा लाभ घेता येईल. तरी कार्यकर्त्यांनी श्री.सुवेंद्र दिलीप गांधी संपर्क कार्यालय, देवेंद्र बंगला, आनंदऋषिजी मार्ग, बुरुडगाव रोड, अहिल्यादेवीनगर येथे संपर्क साधावा असे आव्हान श्री. सुवेंद्र दिलीप गांधी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे
संपर्क नं – ९४२३१७६४८० / ८२०८५८७५०१ / ९४२१४५८३०२