अहमदनगर – समाजातील सामाजिक व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेचे सचिव प्रा विजय शिंदे यांनी सांगितले.
संस्थेच्या डॉ शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल पारगाव (भातोडी) येथे रविवार दि ३१ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता सर्व धर्मीय बांधवासाठी हा मेळावा असणार आहे. यात विदुर, परितक्त्या, घटस्फोटीत, विधवा त्याचप्रमाणे इतर सर्वजन सहभागी होऊ शकतात.
यावेळी उपस्थित राहताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी ९५५२०४४५०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..