विक्रीस आणलेल्या गांजासह, कोपरगांव येथुन आरोपी जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व अंमलदार बाळासाहेब मुळीक, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, उमाकांत गावडे व मपोकॉ/प्रियंका चेमटे अशांचे पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथक कोपरगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि/हेमंत थोरात यांना दिनांक 31/03/24 रोजी इसम नामे प्रदीप बाजीराव पायमोडे रा. मंजुर, ता. कोपरगांव हा कब्जात गांजा बाळगुन त्याचे राहते घरी विक्री करतो अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे जावुन पोनि/संदीप कोळी व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले.
पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी मंजुर, ता. कोपरगांव येथे जावुन संशयीत नामे प्रदीप पायमोडे याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, त्याचे राहते घरा समोर जावुन खात्री करता सदर घरात एक इसम लोखंडी कॉटवर बसलेला दिसला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाजीराव पायमोडे वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले. त्याचे घराची पंचा समक्ष झडती घेता त्याचे घरातील कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला. पथकाने पिवळ्या रंगाच्या गोणीत मिळुन आलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला या बाबत विचारणा करता त्याने पिवळ्य रंगाच्या गोणीत बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असुन विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याने आरोपी नामे 1) प्रदीप बाजीराव पायमोडे वय 32, रा. मंजुर, ता. कोपरगांव याचे घरातील लोखंडी कॉटवर पिवळ्या रंगाच्या गोणीत ठेवलेला 1,06,150/- रुपये किंमतीचा 10 किलो 732 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने तो हस्तगत करुन सदर बाबत आरोपी विरुध्द पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ ने. स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 115/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगांव तालुका पो.स्टे. हे करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा.श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा.श्री. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
- Advertisement -