विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये जागतिक डाउन सिन्ड्रोम दिवस साजरा
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांमध्ये डाउन सिन्ड्रोम आजाराची जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये जागतिक डाउन सिन्ड्रोम दिवस साजरा करण्यात आला. मानसिक आरोग्य परिचारिका विभाग आणि बाल रोग तज्ज्ञ परिचारिका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव गुप्ता उपकेंद्र (ता. नगर) येथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांना डाउन सिन्ड्रोमची माहिती देवून प्रशिक्षण देण्यात आले.
गैरसमजूतीचा शेवट! हे घोषवाक्य घेवून या आजाराबद्दल जागृती करण्यात आली. मानसिक आरोग्य परिचारिका विभाग प्रमुख अमित कडू यांनी डाउन सिन्ड्रोमची संकल्पना आणि त्याचा प्रसार याविषयी माहिती दिली. सहायक प्राध्यापक नितीन निर्मल यांनी डाउन सिन्ड्रोमची करणे व लक्षणे याविषयी माहिती दिली. पल्लवी खराडे यांनी डाउन सिन्ड्रोमचे निदान चाचणी व उपचार याबद्दल समुपदेशन केले. तसेच स्टिफन भाम्बळ यांनी डाउन सिन्ड्रोम वरील प्रतिबंध याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम बालरोग परिचारिका विभागप्रमुख सलोमी तेलधूने, मानसिक आरोग्य परिचारिका विभाग प्रमुख अमित कडू व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.