गोविंदपुरा गुरुद्वारा येथे खालसा बैसाखी दिनानिमित्त आ.संग्राम जगताप यांनी घेतले दर्शन.
मानवता हिच ईश्वर सेवा – आ. संग्राम जगताप
नगर : गोविंदपुरा गुरुद्वार येथे खालसा बैसाखी दिनानिमित्त शिख,पंजाबी, सिंधी समाजाच्या वतीने अध्यक्ष बलदेव सिंग वाही यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस भजन, कीर्तन, कथा याच बरोबर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आ.संग्राम जगताप,धनश्री सुजय विखे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मा.नगरसेवक निखिल वारे, वैभव वाघ, संतोष लांडे, विकी वाघ,अमित गटणे,करण भळगट आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की, शिख, पंजाबी, सिंधी समाजाचे सामाजिक काम मोठे असून त्यांनी नेहमीच मानवता हीच ईश्वर सेवा समजून समाजाप्रती आपली सेवा केली आहे. कोविड महामारीच्या संकट काळामध्ये समाजाने पुढे येऊन लंगर सेवा सुरू केली. त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अन्नदानाचा लाभ मिळाला संकट काळामध्ये धावून जाणे ही समाजाची चांगली गोष्ट आहे. असे ते म्हणाले.
- Advertisement -