- Advertisement -
चर्मकार विकास संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
ज्ञानरूपी प्रकाश सर्वांच्या आयुष्यात येण्यासाठी बाबासाहेबांचे विचार अंगीकारावे -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, वधू-वर परिचय समितीचे अध्यक्ष रामदास सातपुते, खजिनदार अरुण गाडेकर, रुपेश लोखंडे आदी उपस्थित होते.
संजय खामकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर असून, त्यांनी केलेल्या संघर्षमय जीवनातून विषमता नष्ट होऊन मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकात्मता निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक घटना लिहिली. सर्व समाजाला आपल्या ज्ञानमयसागरातून जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. ज्ञानरूपी प्रकाश सर्वांच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
- Advertisement -