पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने परिमल निकम यांचा सत्कार
शासनाच्या वतीने निकम यांना मिळालेला पुरस्कार सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -प्रकाश थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महापालिकेचे अभियंता परिमल निकम यांना मिळाल्याबद्दल पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील मार्केटयार्ड चौकात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या ठिकाणी निकम यांचा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व प्रकाश थोरात यांनी सत्कार केला. यावेळी संदिप पवार, सुरेश बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता संजय गायकवाड, ब्राम्हणे, संजय मंडलिक, जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, परिमल निकम यांना शासनाच्या वतीने मिळालेला पुरस्कार हा सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. निकम यांनी शासकीय सेवेत सामाजिक कार्यात दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. आंबेडकरी चळवळीत निकम परिवाराचे मोठे योगदान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी निकम यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -