रस्त्यावरील कचर्याचे ढीग तातडीने उचलून घंटागाडी नियमितपणे चालू करण्यात यावी
मनसेच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन
नगर- अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.6 उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, अंबर अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट तसेच न्यूक्लियस हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर व आजुबाजूला खूप मोठ्या प्रमाणात कचर्याचे ढीग तयार झाले आहे. ते तातडीने हटविण्यात यावेत, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे सावेडी विभाग अध्यक्ष किरण रोकडे, भूषण कोठारी, समर्थ मुर्तडकर, वृषभ साबळे, शिवम बांगर आधी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटंले आहे की, या भागात घंटागाडी नियमित नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर साठलेल्या कचर्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात घंटागाडी नियमित करावी व रस्त्यावर साठलेला कचरा साफ करण्यात यावा तसे न झाल्यास मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
- Advertisement -