पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
व्यापारी हितेश बोरा यांना मारहाण करत केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- आगरकर मळा येथील व्यापारी हितेश बोरा यांना आदित्य संजय शिदोरे यांनी फोन करून धमकी व शिवीगाळ देऊन तेथेच थांब आलो म्हणून लोखंडी रॉडने मारहाण करून निघून गेला त्यानंतर बोरा हे कोतवाली पोलीस स्टेशन मधून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल झाले व त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आले व तीन दिवस उपचार सुरू होता त्यादरम्यान आरोपी आदित्य शिदोरे हा बिनधास्त फिरत होता व त्याने तीन दिवसानंतर माझ्यावर खोटा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी आदित्य शिदोरे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचा पासून आपण व आपल्या कुटुंबीयांना धोका असल्याने त्याचा वर कारवाई करण्यात यावी त्याने अनेक गुन्हे केलेले असून आदित्य शिदोरे हा दबाव टाकून गुन्हा दाखल होऊ देत नव्हता त्यानंतर तरी मी गुन्हा दाखल केला त्यामुळे त्याने माझ्यावर पण दबाव आणण्याचा प्रयत्न केला मला आलेल्या फोनची रेकॉर्डिंग पोलिसांना चौकशी साठी दिले असता चौकशी न करता खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला त्यामुळे प्रथम आरोपी आदित्य शिदोरे या आरोपीला अटक करून त्याच्यावर 326 चा गुन्हा दाखल करण्यात यावा व खोटा गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले..
- Advertisement -