नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह.भ.प. योगेश महाराज जाधव यांचे किर्तन संपन्न.
मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव,कृती, ज्ञान असले पाहिजेत यामुळे प्रगल्भ समाज निर्माण होतो – ह.भ.प. योगेश महाराज जाधव
नगर : संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगात म्हणाले होते की, आमच्या जवळ भौतिक सुविधा नाही, मात्र आमच्या जीवनात आनंद आहे. आजच्या काळामध्ये समाजात भौतिक सुविधा असून देखील आनंदी जीवन जगता येत नाही. आपली भूमी संतांच्या विचाराने पावन झाली असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकरावे ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांवर धाक नसेल तर सुसंस्कृत पिढी घडू शकत नाही. पूर्वी शिक्षकाबद्दल आदर युक्त भीती होती आता ते चित्र पहावयास दिसत नाही बाल वयातच चांगले संस्कार दिले नाही. तर चांगली पिढी निर्माण होणार नाही. समाजामध्ये वावरत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव,कृती, ज्ञान असले पाहिजेत यामुळे प्रगल्भ समाज निर्माण होतो. जगाचा उद्धार कसा व्हावा याची काळजी संत म्हणतांनी केली आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. योगेश महाराज जाधव यांनी केले.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह.भ.प. योगेश महाराज जाधव यांचे किर्तन संपन्न त्यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -