- Advertisement -
श्री हनुमान जयंती निमित्त श्री पावन हनुमान मंदिर यांच्या वतीने पारंपारिक भव्य शोभायात्रा व ह भ प मारुती महाराज झिरपे यांचे काल्याचे किर्तन संपन्न
श्री हनुमान हे शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक – आमदार संग्राम जगताप
नगर : श्री हनुमान जयंती निमित्त नालेगाव येथे पारंपारिक भव्य शोभायात्रा संपन्न झाली, यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात व श्री हनुमानाच्या नामघोषाने परिसर अक्षरशा दुमदुमला होता, नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने शोभायात्रे निमित्त रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच पालखीचे स्वागत करून फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेत शोभायात्रा संपन्न झाली, यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा व अखंड हरिनाम सप्ताहाचि सांगता ह भ प मारुती महाराज झिरपे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, यावेळी आ. संग्राम जगताप, प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल आदीसह भाविक उपस्थित होते.
चौकट : श्री हनुमान हे शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक
श्री हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची भक्ती श्रद्धा भावनेने केली, धार्मिकतेमध्ये हनुमान हे शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहे, हनुमानासारखी श्रद्धा आपल्या आई-वडिलांवर ठेवा आणि त्यांचा संभाळ चांगला करा आजच्या युगामध्ये धार्मिकतेची परंपरा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे, या माध्यमातून संस्काराचा व विचाराचा वारसा पुढे घेऊन जाता येत असतो नालेगाव मधील मुदगल कुटुंबीयांनी गावपण जोपासण्याचे काम केले आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
चौकट :
अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो, श्री हनुमान यांचे कार्य महान असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारावे, हनुमान हे भक्ती देणारे दैवत आहे संत महंतांचे विचार समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमाचे केंद्र बनले आहे असे मत ह भ प मारुती महाराज झिरपे यांनी व्यक्त केले.
- Advertisement -