कृषी विभागाकडून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म 1901साली झाला. वयाच्या 23व्या वर्षी सहकाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. डॉ. विखे शेतकरी कुटुंबातील असून, ते दूरदृष्टीचे होते. विचारशक्तीच्या बळावर त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत करीत अशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरू केला. त्यांचा जन्मदिन शेतकरी दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त शेतकर्‍यांना प्र्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केला जातो. पद्मश्रींच्या दूरदृष्टीमुळेच सहकार चळवळ व्यापक झाली, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. जगताप बोलत होते.याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, चिचोंडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे, विष्णू जरे, संदीप गुंड, ज्ञानदेव रोकडे, नाथा देशमुख, विजय सोमवंशी, जालिंदर गांगर्डे, श्रीकांत जावळे, विद्या भोर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, नगरला कृषी विभाग व विविध संस्थांच्या वतीने पद्मश्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील विविध शेतकर्‍यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांचा गौरव यानिमित्त करण्यात आला. शेतकर्‍यांनी वेगवेगळे प्रयोग करणे ही काळाची गरज बनलेली आहे. शासकीय पातळीवर त्यासाठी विविध योजना असून, त्याद्वारे शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा, कृषी उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.

श्री. कापसे म्हणाले की, महाराष्ट्र हे सहकारातील पहिले राज्य आहे. राज्याची ओळख पद्मश्रींमुळे आहे. सहकारामुळे शेती क्षेत्रात मोठा बदल घडू शकला. शेती व सहकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करताहेत. पद्मश्रींच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांनी आपण प्रत्येकाने वाटचाल करू या, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात पोपटराव नवले म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांना सधन करण्यामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे राज्यातील शेतीला प्रेरणा मिळाली असून, त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील उत्कृष्ट शेतकर्‍यांचा सन्मान केला. या शेतकर्‍यांचा आदर्श घेऊन इतर शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून चांगले उत्पन्न घेता येईल, असे ते म्हणाले.

ज्ञानेश्‍वर वाघ, अरविंद पवार, सुनील कराळे, राहुल पवार, संदीप कर्डिले, बन्सी शिंदे, उस्मानभाई पठाण, विकास जाधव, विद्याताई भोर, सुनील मोरे, संजय चाबूकस्वार, नाथा देशमुख, विष्णू जरे, धोंडिभाऊ जरे आदी शेतकर्‍यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच मनोज कोकाटे, विद्याताई भोर, नाथा देशमुख, विष्णू जरे, संदीप गुंड आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन यशवंत गाडेकर यांनी केले, तर आभार प्रकाश करपे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles