गुरु शिष्यांना दिला पालकांनी आनोखा निरोप आणि केले नवागतांचे स्वागत
संजय काळेंना सेवापूर्ती निरोप
निंबळक – जिल्हा परिषद प्राथ. शाळा सारोळा स्टेशन येथे पालकांच्या उपस्थितीत इयत्ता पाहिली प्रवेशोत्सव मेळावा, इयत्ता चौथी च्या मुलांना निरोप देण्यात आला.महिलांनी इयत्ता पहिली प्रवेशीत मुलांचे औक्षण केले .ढोल ताशांच्या गजरात मुलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.तसेच सारोळा स्टेशन शाळेचे शिक्षक संजय रभाजी काळे आणि अकोळनेर केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास इंगळे साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांनी संजय काळे गुरुजी व केंद्रप्रमुख रामदास इंगळे या दोघांचाही सपत्नीक सत्कार केला.
यावेळी पालकांनी व सत्कारमूर्ती रामदास इंगळे व शिक्षक संजय काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शैक्षणिक सेवेतील मौलिक अनुभव व शाळेसाठी भौतिक सुविधांसाठी पालकांनी केलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त करून गुणवत्ते साठी सतत आग्रही राहिल्याचे नमूद केले . तसेच संजय काळे यांनी पहिली ते चौथी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट गणवेश भेट म्हणून दिला. यावेळी सृष्टी चांगदेव कडूस, अर्जुन तात्याराम कडूस ,श्रेयश थोरात, स्वरा धामणे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली
कार्यक्रमास गुरुमाता विमल सर्जेराव धामणे,शाळा व्यव . समितीचे अध्यक्ष बाळासाहेब धामणे, उपाध्यक्ष मनेश धामणे, दत्ता महाराज कडूस, बाळासाहेब धामणे, नानासाहेब पारधे, अविनाश धामणे, शुभांगी काळे, सुकन्या धामणे, स्वाती धामणे ,सोनाली धामणे, मनिषा धामणे, मा .केंद्रप्रमुख आत्माराम धामणे, मा . मुख्या . संजय धामणे, नानासाहेब जाधव, रमेश काळे, अरुण काळे, विजय काळे, सुभाष काळे, विठ्ठल काळे, अनिता कडूस, मनिषा थोरात,तुषार धामणे, स्वप्निल थोरात, बाळासाहेब साळवे ,विजय साळवे साहेब, डॉ . श्रीकांत देशपांडे, मछ्चिंद्र काळे, मंगेश धामणे, रघू धामणे, बंडू धामणे, अनिल धामणे, राजू शेख व शाळेचे सर्व पालक, ग्रामस्थ अकोळनेर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रम अध्यक्ष माजी केंद्रप्रमुख किशोर हारदे यांनी शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुक केले. ‘शिक्षकांनी आपले काम प्रामाणिक पणे केले तर त्यांची स्वतःची मुले आपो आप शिकतात. तसेच मंथन राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा१००% निकाल व लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा१००% निकाल आणि मिशन आरंभ जिल्हा परिषद अहमदनगर यापरीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल मुलांचे प्रमाणपत्र देवून कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कडूस यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार शाळेच्या शिक्षिका रेश्मा गांगर्डे यांनी केले .