डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव सोहळा संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सोहळा गेल्या दोन वर्षापासून केडगाव मधील देवी मंदिरासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी देखील जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने तेथील नागरिकांनी आंबेडकर जयंतीचा सोहळा पाहण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद दिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सोहळ्यामध्ये वैचारिक व सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. व भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 13 फुटी भव्य दिव्य पूर्णा कृती पुतळा तेथील प्रमुख आकर्षण ठरले त्याचबरोबर प्रथमच आंबेडकर जयंती ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने व महात्मा जोतीराव फुले यांना मानवंदना करून झाली.
अशा सर्व महापुरुषांचा वारसा जपणारी जयंतीची सुरुवात प्रथमचं नगर जिल्ह्यातील केडगाव उपनगरातील देवी चौक येथून सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब शिंदे व आंबेडकरी चळवळीतील शुभम प्रकाश गायकवाड यांच्या वतीने काढण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक सचिन आबा कोतकर समवेत नगरसेवक मनोज दादा कोतकर, बाळासाहेब कोतकर, संचालक शाम कोतकर, अण्णासाहेब शिंदे, नवनाथ कोतकर, अजित कोतकर, सरपंच राहुल आल्हाट, भूषण गुंड, विशाल भिंगारदिवे, बाळासाहेब शिंदे, कृष्ण काकडे, सागर ठोंबे, अक्षय ठोकळ, करण सुर्वे, अक्षय भोसले, बाळू गमरे, निखिल निकाळजे, राहुल शिंदे, सुदर्शन ठोबे, संकेत निकाळजे, सार्थक लांडे आदी उपस्थित होते.यावेळी औरंगाबाद येथील व्याख्याते धम्मचारी ललित सिद्धी यांच्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.