अंधारलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बॅटरीच्या टॉर्च च्या माध्यमातून विकास कामाचा प्रकाश पाडणार- भारत संभाजी भोसले

- Advertisement -

अंधारलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बॅटरीच्या टॉर्च च्या माध्यमातून विकास कामाचा प्रकाश पाडणार- भारत संभाजी भोसले

समता पार्टीचा वचननामा जाहीर                                                       

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदारसंघात समता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारत संभाजी भोसले यांच्या वचन नाम्याचे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते म्हणाले की, विकास कामाच्या अभावामुळे अंधारलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बॅटरी टॉर्च च्या माध्यमातून विकास कामांचा प्रकाश पाडून दाखवणार व अच्छे दिन आले नाही म्हणून सच्चे दिन आणणार व शेतकऱ्यांचा मुलगा व मतदार संघात राहणारा असल्याने २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार असून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या व्यवसायाचे मालक बनविणार व कांदा, टोमॅटो, भाजीपाला यासारख्या मालाची पावडर बनवणाऱ्या सामूहिक कंपन्या काढणार त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट व चांगला भाव मिळणार.

तसेच सामूहिक कंपन्या आल्यामुळे प्रत्येक घरातील शेतकरी कंपनीचे मालक होणार मतदार संघात १००% दारू बंद करणार तसेच शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असून सरकारी शाळा व शिक्षण चांगल्या दर्जाचे बनविणार व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्यासाठी केंद्रात आवाज उठविणार व समस्या सोडविणार व गावागावात समता दरबार भरून गावातल्या समस्या गावातच सोडवणार व शासकीय योजनांचा पाठपुरावाही गावातच सरकारी अधिकारी बोलवून केला जाणार तसेच सरकारी हॉस्पिटल चांगल्या दर्जाचे व चांगले डॉक्टर व स्टाफ असणारे बनविणार व संविधानाचे रक्षण करून सर्वांना योग्य न्याय मिळावा याची दक्षता घेणार व पंतप्रधान जर चुकीचे काम करत असतील तर त्यांना दिल्लीत जाऊन नडेल असा एकमेव उमेदवार मी राहणार व रस्ते, पाणी, दळणवळण या समस्यांचा शंभर टक्के पाठपुरावा करणार असल्याची भावना समता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारत संभाजी भोसले यांनी आपल्या वचन नाम्यात महटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles