खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

- Advertisement -

खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

दुसरी तपासणी ७ मे रोजी

*शिर्डी, दि.३ मे २०२४ – खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे पार पडली.

या तपासणीस सर्व २० उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत: व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. दुसरी तपासणी ७ मे रोजी पार पडणार आहे. या तपासणीस सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवह्यांसह उपस्थित रहावे. असे आवाहन खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी केले आहे.

या तपासणीला समन्वय अधिकारी (खर्च) सदाशिव पाटील, सहायक समन्वय अधिकारी (खर्च) बाबासाहेब घोरपडे व सचिन धस, सहायक खर्च निरीक्षक विवेक वर्मा, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles