भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर शहर शाखा आयोजित समता सैनिक दल धार्मिक प्रशिक्षण शिबिर संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अहमदनगर शहर शाखा आयोजित समता सैनिक दल धार्मिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रशिक्षण शिबिराची सांगता करण्यात आली यावेळी मेजर राजरतन थोरात यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रा.राम गायकवाड , जिल्हा अध्यक्ष भगवंत गायकवाड, महासचिव राजेंद्र साळवे, पी.एस.आय सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष विजय चाबुकस्वार, उपाध्यक्ष सुभाष कांबळे, महिला सैनिक सुनीताताई गायकवाड,आशाबाई गायकवाड, बनकर मॅडम, अर्चना मॅडम, चाबुकस्वार मॅडम, अनुपमा डहाने, प्रिया मॅडम आदीसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राम गायकवाड सर म्हणाले की,भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर शहर शाखेच्या वतीने आयोजित समता सैनिक दल धार्मिक प्रशिक्षण शिबिर हे दोन दिवसीय झाले असून यामध्ये महिला व पुरुषांनी सैनिक होण्यासाठी खूप मेहनत घेतली असून त्यांचे कौतुक केले. व अहमदनगर मध्ये एका वर्षात एक हजार समता सैनिक तयार करणार असल्याची भावना व्यक्त करत अहमदनगर शहरामध्ये पन्नास महिला व पुरुष सैनिक तयार झालेले आहे त्यांची दर रविवारी परेड घेण्यात येणार असल्याचे सांगितले व मेजर राजरतन थोरात, जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड, महासचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष विजय चाबुकस्वार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.व अर्चना गायकवाड यांनी सर्वच महिला, पुरुष सैनिकांचे व उपस्थितां चे आभार मानले.