गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे बेकायदेशीरपणे होणाऱ्या भूमिपुजन सोहळ्याच्या विरोधात केलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्राद्वारे मागे
न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार – शरद क्यादर
नगर : गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे स्वयंघोषित ट्रस्टींकडून बेकायदेशीरपणे भूमिपुजन सोहळ्याचे १० मे रोजी आयोजन केलेआहे, याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शरद क्यादर यांनी आमरण उपोषण सुरु केले यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांनी चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांना सूचित करण्यात आले की शरद क्यादर यांचे आमरण उपोषण स्थगित करावे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, या लेखी आश्वासनाची प्रत शरद क्यादर यांना देण्यात अली त्या नंतर त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी शंकर सामलेटी,जयंत रंगा,राजू म्याना व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका दगडे ,मुख्याध्यापक छिंदम,गोरे,मुत्याल व इतर कर्मचारी उपस्थित होते.
शरद क्यादर म्हणाले की श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट या संस्थेवर आज अखेर कोणीही अधिकृत ट्रस्टी व पदाधिकारी नाहीत श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्याबद्दल अर्ज उप धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांनी कायदेशीर फेटाळला आहे असे असताना पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विरोधात काम करणारे काही लोक व विरोधी गटातील काही विघ्नसंतोषी लोक हे एकत्र येत त्यांनी बनावट निवडणूक घेतल्याची कागदपत्रे तयार करून तसा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे त्या अर्जावर हरकत घेतलेली आहे असे असतानाही आम्हाला असे समजते की काही स्वयंघोषित विश्वस्त यांनी विघ्नसंतोषी लोकांना हाताशी धरून चुकून धर्मदाय आयुक्त यांच्या परिशिष्ट १ वर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन एका 85 वर्षीय वृद्ध इसमाची फसवणूक करून अहमदनगर महापालिकेच्या बांधकाम परवानगी अर्जावर सही घेऊन तसेच परवानगीसाठी अर्ज सादर करताना खोटे कागदपत्रे सादर करून आयुक्त अहमदनगर महापालिका यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवली, मात्र कोणत्याही धर्मदाय संस्थेच्या मालमत्तेची विक्री, सुधारणा, जीर्णोद्धार करायचा असल्यास धर्मदाय आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून त्याची लेखी परवानगी घेऊन त्यानंतरच बांधकाम परवानगी मिळते पण श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही व तसा कोणताही अर्ज अखेर सादर केलेला नाही तरी देखील बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळा करण्याचे ठरविलेले आहे.
श्री मार्कंडेय मंदिर जीर्णोद्धार सोहळा बेकायदेशीर व तथाकथित लोकांनी आयोजित केलेला आहे याच्या नावाखाली पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ व श्री मार्कंडेय विद्यालय यांच्या ताब्यात वर्षानुवर्ष असलेल्या इमारती पाडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे या शाळेमध्ये सुमारे १५०० ते १७०० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच कोतवाली पोलीस स्टेशन यांनी अर्जाबाबत माहिती घेत मार्कंडेय देवस्थान वाद धर्मदाय आयुक्त पुणे यांच्या कोर्टात प्रलंबित आहे तसेच धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्या कोर्टात अर्ज प्रलंबित आहे तरी आपण दिलेल्या अर्जाबाबत आपण या धर्मदाय आयुक्त यांच्या कोर्टात दाद मागावी तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे बांधकाम अथवा काही काम करू नये याबाबत गैर अर्जदार यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावणी करण्यात आली आहे अशी माहिती देत याबाबत केलेले आमरण उपोषण हे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने मागे घेत असून न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार असे शरद क्यादर यांनी सांगितले
- Advertisement -