शेवगाव प्रतिनिधी-निकेत फलके
जागतिक क्रीडा दिवसाचे औचित्य साधून फलकेवाडी मध्ये गुरुदत्त तरुण मंडळाच्या वतीने एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उद्घाटन फलकेवाडी गावातील क्रीडा शिक्षक प्रा. विक्रम संभाजी काळे सर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमादरम्यान काळे बोलताना म्हणाले की, सध्याचा काळ हा हायटेक झाला आहे त्यामुळे तरुण वर्ग मैदानी खेळ विसरत चालला असून तो मोबाईल मध्ये रमल्याचे चित्र आज समाजात दिसत आहे.मैदानी खेळ हे शरीर तंदुरुस्त ठेवन्यास मदत करते दररोज व्यायाम, योगासने करायला हवेत जेणेकरून आरोग्य सुरक्षित राहण्याचा फायदा होतो. आज या गुरुदत्त तरुण मंडळाच्या वतीने या स्पर्धा भरवल्यात यामुळे एकमेकांशी संबंध, ओळख तसेच शरीराचा या माध्यमातून व्यायाम होतो. कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॅलीबॉल, टेनिस इ मैदानी खेळ तरुण वर्गांना खेळली पाहिजे.यामुळे तरुण व्यसनमुक्त देखील होण्यास मदत होईल व पोलीस भरती,सैनिक भरतीकरिता प्रेरणा मिळते तसेच या भरतीकरिता मार्गदर्शन करण्याची तयारी देखील दर्शवली.
या स्पर्धेकरीता रविंद्र सर फलके, गोकुळ तरटे, सुयोग देवढे, सनी शिंदे ,सचिन काळे, तुषार फलके ,ओमकार फलके, बाळू डोईफोडे ,आकाश फलके, गणेश फलके, भागवत देवढे, ताठे राम ,सौरव फलके, अविनाश कराळे, ऋषिकेश लंगोटे, सिद्धार्थ तरटे आदीचे मोलाचे सहकार्य लाभले.