देशातील धर्मवेडेपणा आणि जातांध प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा प्रयत्न -ॲड. गवळी

- Advertisement -

देशातील धर्मवेडेपणा आणि जातांध प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा प्रयत्न – ॲड. गवळी

सत्ताधाऱ्यांनी संविधानाची पोथी केल्याने समानतेच्या तत्वाची पूर्णपणे मोडतोड झाल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभज्ञाक तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने राबवून या देशातील धर्मवेडेपणा आणि जातांध प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. लोकभज्ञाक तत्वज्ञानापासून देशाचे पंतप्रधान लांब असून, सत्ताधाऱ्यांनी संविधानाची पोथी केल्याने जातीवाद, स्त्रीयांना दुय्यम दर्जा देणारी पध्दत व आजही अल्पसंख्यांकांना दुय्यम लेखण्याचे काम केले जात आहे. तरसंविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाची पूर्णपणे मोडतोड करण्यात आली असल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.

शेकडो वर्षे या देशात जातीय व्यवस्था टिकण्याला मनुवाद कारणीभूत आहे. एकवीसाव्या शतकातही मनुचा अंमल सुरु आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून टोकाचा धार्मिक द्वेष दिसून येतो. भारतीय संविधानानुसार या देशात कायद्याचे राज्य नसून रामभरोसे राज्य अस्तित्वात असल्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीच्या काळात तमाम जनतेला आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याबाबत किंवा परवडणाऱ्या घराबाबत लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर स्कीम राबविण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी एक शब्द देखील काढला नाही. त्यांच्या भाषणातून फक्त देशवासीयांची करमणूक झाली आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती याबाबत पंतप्रधान पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. या देशात रामराज्याच्या नावाखाली मागच्या दाराने मनुवादी शासन प्रणाली राबवण्याचा त्यांचा मानस असल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.

लोकभक्ती तत्वज्ञानाप्रमाणे सर्व सजीवांच्या ठिकाणी असणारे चैतन्य परमेश्‍वराचे स्वरूप आहे आणि त्यामध्येच राम पाहिला पाहिजे. परंतु पंतप्रधानांच्या भाषणामुळे देशात पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्व काळातील यादवी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे ॲड. गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. लोकभज्ञाक चळवळीचा विस्तार व्यापक करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, ओम कदम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles