अहमदनगर जिल्हा रीलें स्केटिंग स्पर्धेत खेळाडूंचे घवघवीत यश
गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य रिले स्केटिंग संघटनेच्या वतीने व छत्रपती संभाजी नगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पीड व रिले स्केटिंग स्पर्धांचे आयोजन औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडले सदर स्पर्धामध्ये अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या खेळाडूने भाग घेत अत्यंत चुरशीची लढत देत पदकांची लयलूट केली. निकाल खालील प्रमाणे वैभव प्रदीप पाटोळे याने क्वॉड्स – 1 सुवर्ण 1 रौप्य 1 कांस्य, तन्मय गोटे सुवर्ण व कांस्य, रोहित आव्हाड 2 कांस्य, वरद पेद्राम 1 सुवर्ण 2 रौप्य, अर्सलान शेख 1 रौप्य 1 कांस्य, जैनब शेख 1 सुवर्ण 1 कांस्य, अक्रम शेख 1 सुवर्ण 1 कांस्य, हमजा शेख (सर्वोत्कृष्ट स्केटर) 2 कांस्य, या सर्व खेळाडूंचे या यशाबद्दल संघटनेचे अधक्ष्य झिशान शेख यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक करत मुलांचा सत्कार करण्यात आले यावेळी अधक्ष्य झिशान शेख समवेत टेनिस बॉल क्रिकेट संघटना संस्थापक सचिव सचिन गायकवाड, अक्षय चोपडे, टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी च्या अधक्ष्या सौ. सविता पाटोळे, एन एस पी फाउंडेशनचे नलिनी सुंदर पाटोळे, अविनाश गोटे, मुख्य प्रशिक्षक प्रदीप पाटोळे, सागर भिंगारदिवे, संदीप पेद्राम आदी उपस्थित होते.
यावेळी अधक्ष्य झिशान शेख म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेचे खेळाडूंनी अत्यंत चुरशीची लढत देत पदकाची लय लूट केली असून गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी याच मुलांची निवड झाली असून गोवा येथे खेळण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले व क्रीडा अधिकारी व मनपा आयुक्त यांची भेट घेऊन शहरात एक भव्यदिव्य स्केटिंग ग्राउंड उपलब्ध करण्यासाठी मागणी करणार असल्याची भावना व्यक्त केली.