सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
व्यापार्यांपुढे ऑनलाइन व्यवसायाची स्पर्धा – आ. संग्राम जगताप
नगर : शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्यामुळे लोक वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे नव-नवीन बाजारपेठा तयार होत असतात. शहराचे पहिले उपनगर सावेडी असून या ठिकाणी चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे. बाजारपेठ म्हणजे फक्त व्यवसाय नसून या ठिकाणी रोजगार निर्मिती होत असते. अनेक तरुण-तरुणी या ठिकाणी काम करत आहे. सर्वांच्या सहकार्यातून व्यापारी करणाला चालना मिळत असते. नवनवीन बाजारपेठा निर्माण होणे गरजेचे आहे. असोशियन ग्राहक आणि व्यवसाय यामधील दुवा आहे. बाजारपेठेच्या माध्यमातून नागरिकांना आपापल्या भागामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून विचार विनिमय होत असतो. या माध्यमातून एकमेकांमध्ये सलोखा निर्माण होतो. व्यापार्यांपुढे ऑनलाइन व्यवसायाची स्पर्धा असून यामध्ये टिकण्यासाठी सावेडी व्यापारी असोशियनने काम करावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली असून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण, सचिव प्रमोद डोळसे, खजिनदार केतन बाफना, उपाध्यक्ष संतोष भोजने, नूतन उपाध्यक्ष देवदत्त पाऊलबुद्धे,उपाध्यक्ष विनय पित्रोडा,खजिनदार प्रसाद कुलकर्णी,सहसचिव श्रीपाल कटारिया, नूतन सदस्य एल एम चव्हाण, अविनाश गुंजाळ, सचिन बाफना, मंगेश निसळ, आनंद कटारिया, अनुज गांधी, रोहित पवार, लक्ष्मीकांत चिट्टे आदीसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
अध्यक्ष शिवाजी चव्हाण म्हणाले की, सावेडी व्यापारी असोशियन चे सदस्य आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच भाग घेत असतात रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कामधेनु संवर्धन गोशाळेला चाऱ्यासाठी ११,००० रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये असोसिएशन भाग घेऊन प्रश्न मार्गी लावत असते. व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापारी बांधव एकसंघ राहत असतात व आपल्या विचारांची देवाण-घेवाण करत असतात असे ते म्हणाले.
- Advertisement -