अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने एस. के. क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न
एपीएल टूर्नामेंट खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरेल – माजी महापौर बाबासाहेब वाकळे
नगर : अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने एस. के. क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना वाकोडी येथील साईदीप क्रिकेट मैदानावर शिवनेरी टायगर विरुद्ध जी एन एस नाईट रायडर्स संघात अटीतटीचा सामना पार पडला असून यात जी एन एस नाईट रायडर्सने अंतिम सामना जिंकला यांत १४ वर्षाखालील बाल क्रिकेटर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, शेवटच्या बॉल पर्यंत सामना चांगलाच रंगला होता. ही एपीएल टूर्नामेंट खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरेल, पूर्वी आमच्या काळात क्रिकेट खेळाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, मात्र आता नगरमध्ये खेळाडूंना या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, क्रीडा क्षेत्रात करियरच्या अनेक संधी असून बालवयातच खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नगर शहरातून चांगले खेळाडू निर्माण होऊन देश पातळीवर ते खेळतील व आपल्या शहराचे नाव उंचावतील, एस.के.क्रिकेट ॲकॅडमीने क्रिकेट खेळाचे व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एस के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित १४ वर्षाखालील एपीएल क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी करण कराळे, रवी वाकळे, एस के क्रिकेट ॲकॅडमीचे संचालक संदीप आडोळे, सार्थक ख्रिस्ती, अजय कविटकर, संदीप घोडके, सागर बनसोडे, महेश गलांडे, दीपक आडोळे, मनोज अडोळे, वसंत अडोळे, सागर पंजाबी, अमोल दंडवते, विशाल वाकळे, टीम मालक सम्राट देशमुख, वैभव करंडे, करण भोगाडे, किशोर वाकळे, राजेंद्र वाकळे, डॉ.हर्षवर्धन तन्वर, अभिनंदन भन्साळी, सय्यद हमजा,प्रेम गांगुली, उषा देशमुख आदी उपस्थित होते.
रवी वाकळे म्हणाले की, खेळाडू घडण्याचे काम स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. क्रिकेटपटूला बालवयातच लेदर बॉल वर क्रिकेटचे सामने खेळवणे गरजेचे आहे. जेणेकरून तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल, यशाच्या शिखरावर जाण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीची खरी गरज आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये एकोपा निर्माण होत असतो. आम्ही नेहमीच खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असतो. क्रिकेटर्स संदीप आडोळे हे एस के क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण करीत असल्याचे ते म्हणाले.
करण वाकळे म्हणाले की ए पी एल क्रिकेट स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटाखालील जिल्ह्यातील 140 खेळाडू सहभागी झाले होते त्यांनी आपले क्रीडा प्रदर्शन करत क्रिकेट प्रेमींचे मन जिंकले, खेळाडूंसाठी जितक्या जास्त क्रीडा स्पर्धा आयोजित होतील तितके जास्त खेळाडू निर्माण होतील, ही स्पर्धा वाकोडी येथे संदीप घोडके यांच्या टर्फ विकेट मैदानात पार पडली असून हे मैदान म्हणजे चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण आहे. असे ते म्हणाले,
एस के ॲकॅडमीचे संचालक संदीप आडोळे यांनी सांगितले कि या ठिकाणी पार पडलेल्या १४ वर्षाखालील एपीएल क्रिकेट स्पर्धेत अनेक खेळाडूंनी विविध पारितोषिके पटकावली असून यात बेस्ट खेळाडू, बेस्ट बॉलर व मॅन ऑफ द सिरीज शौर्य देशमुख, बेस्ट बॅट्समन साईश देवकर, बेस्ट फिल्डर श्रीदीप अडागळे, मॅन ऑफ द मॅच व हॅट्रिक ऑफ द टूर्नामेंट साईश साळवे, आदींनी या क्रिकेट स्पर्धेत पारितोषिके पटकावली, या टूर्नामेंटमधील विजेतेपद जी एन एस नाईट रायडर्स आणि उपविजेतेपद शिवनेरी टायगर यांनी पटकावले यावेळी सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून त्यांना गौरवण्यात आले आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.