अडथळा येणाऱ्या काटवण खंडोबा रस्त्याची पाहणी

- Advertisement -

अडथळा येणाऱ्या काटवण खंडोबा रस्त्याची पाहणी

लगेच काम चालू करण्याचे आमदार संग्राम जगताप यांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन परिसर आगरकर मळा या उपनगराला जोडणारा जवळचा मार्ग काटवन खंडोबा रस्ता या डीपी रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी राज्य शासनाकडून सुमारे साडे ७ कोटी मंजूर करून घेतले व महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार देखील नियुक्त केला आहे. मात्र काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे एक वर्ष होऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे आज नागरिकांसमवेत पाहणी करत रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे सारखाच रस्ता मोजून काम सुरू करण्यासाठी नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, काटवन खंडोबा हा रस्ता कॉंक्रिटीकरण होणार असून या भागाच्या विकासाला गती प्राप्त होत सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल व स्थानिक नागरिकांच्या जागेला देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढ होणार असून तरी शहर विकासासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केली, काटवन खंडोबा रस्त्यावरील खोकर नाला या ओढ्यावरील आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागले आहे.

आज सकाळी आयुर्वेद चौक ते काटवण खंडोबा रस्ता,आगरकर मळापर्यंत स्थानिक नागरिकांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जागेचे मोजमाप करण्यात आले व लगेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून काटवन खंडोबा रस्त्याचे काम मार्गी लागणार असून त्यासाठी महापालिकेने देखील पाण्याची लाईन स्थलांतरित करून ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी आदेश देत विद्युत महावितरणाने देखील डीपी, विद्युत खांब तातडीने स्थलांतरित कराव्यात अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला दिल्या व काटवन खंडोबा रस्त्याच्या कामासाठी आ. संग्राम जगताप यांनी स्थानिक नागरिकांसमवेत पाहणी केली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, प्रा. माणिकराव विधाते, विजय गव्हाळे, मयूर बांगरे, संभाजी पवार, राजू जाधव, राजू एकाडे, शाम व्यवहारे, अशोक आगरकर, किसन व्यवहारे, विश्वास डांगे, गजानन ससाणे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, पठाण साहेब, विकी कानडे, कुमार गाडळकर, मनीष फुलडहाळे, सिद्धांत जाधव, राहुल बोरुडे, अक्षय गाडळकर, अभिजीत काळे, विजय जाधव, ऋषी ताठे, बंटी जाधव आदीसह नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles