सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने श्रीराम कथा कलश प्रदक्षिणा दिंडी सोहळ्याचे स्वागत संपन्न
श्री प्रभू रामचंद्र यांच्या विचाराची समाजाला खरी गरज – संपत बारस्कर
नगर : धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो त्या माध्यमातून संस्कार व संस्कृती जोपासली जात असते श्री प्रभू रामचंद्र यांच्या विचाराची समाजाला खरी गरज असून आजच्या युवा पिढीला अध्यात्मिकतेचे धडे देणे तितकेच गरजेचे आहे, कोहिनूर मंगल कार्यालय इथे श्रीराम कथा रस रहस्य सोहळ्याचे आयोजन केले असून या ठिकाणी भाविक वर्ग धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेत आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
कोहिनूर मंगल कार्यालय येथून श्रीराम कथा कलश प्रदक्षिणा दिंडी सोहळा सुरू झाला असून कुष्ठधाम रोड येथे सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वागत करत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण, सचिव प्रमोद डोळसे, शरद बोरुडे, रोहित पवार खजिनदार केतन बाफना, उपाध्यक्ष संतोष भोजने, नूतन उपाध्यक्ष देवदत्त पाऊलबुद्धे, उपाध्यक्ष विनय पित्रोडा, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सहसचिव श्रीपाल कटारिया, नूतन सदस्य एल एम चव्हाण, अविनाश गुंजाळ, सचिन बाफना, मंगेश निसळ, आनंद कटारिया, अनुज गांधी, लक्ष्मीकांत चिट्टे आदीसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
शिवाजी चव्हाण म्हणाले की,सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने नेहमीच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, सावेडी परिसरात श्रीराम कथा कलश प्रदक्षिणा दिंडी सोहळा धार्मिक, भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला, यावेळी असोसिएशनच्या वतीने या दिंडीचे स्वागत करत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असे त्यांनी सांगितले.