जम्पिंगच्या खेळण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

- Advertisement -

श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची धमाल

जम्पिंगच्या खेळण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद

विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आनंदाने खेळण्यासाठी जम्पिंगच्या खेळणे ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या खेळण्याचा मनमुराद आनंद लुटून हसत खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी धमाल केली.

शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन लेझीमचा डाव व ढोल पथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प वाटप करण्यात आले. प्रारंभी पद्मशाली विद्या प्रसासरक समाज संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज दुलम, समाजसेवक राजेंद्र पासकंटी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, शशिकांत गोरे, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी व श्रमिक बालाजी मंदिर देवस्थानचे पदाधिकारी आदींसह शालेय शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सम्रग शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. वर्गात फुग्यांची सजावट करण्यात आली होती. श्रमिकनगर परिसरात शिक्षकांनी गृहभेटीचा उपक्रम उत्तमपणे राबविल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती. तर नवीन विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेऊन शाळेत हजेरी लावली होती. संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles