प्रभाग क्रमांक ११ मधील मोकाट कुत्रांचा मनपाने बंदोबस्त करावा अन्यथा सर्व शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडण्यात येतील नगरसेवक अविनाश घुले यांचा इशारा

- Advertisement -

नगर- .

ahmednagar amc ward 11 street dogs नगर शहर मधील प्रभाग क्रमांक ११ मधील जुनी वसंत टॉकीज परिसर , पार्श्वनाथ कॉलनी ,पूनममोती नगर ,तपकीर गली परिसर तसेच शहरच्या विविध भागामध्ये मोकाट कुत्रांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणवर झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण पसरले आहेत . मनपा प्रशासनाने कुत्रे पकडणारे ठेकेदार यांची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी मा नगरसेवक अविनाश घुले यांनी केली आहे .येत्या सात दिवसांमध्ये हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर पूर्ण नगर शहर मधील मोकाट कुत्रे मनपा च्या आवारात सोडले जातील असा इशारा घुले यांनी दिला आहे .

अविनाश घुले म्हणाले कि नगर शहर मध्ये दिवस असो व रात्र विविध भागामध्ये मोकाट कुत्रे च्या झुंड च्या झुंड नागरिकांवर हल्ला करताना दिसत आहे .वाहनचालकाच्या मागे धावणे ,पाठलाग करणे यामुळे वाहनचालक घाबरून जातो व कदाचीत वाहनाचा अपघात होऊ शकतो ,शाळेत जाणारे विद्यार्थी ,महिला ,यांच्या अंगावर कुत्रे धावून जातात .जर एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची सर्व जबाबदारी हि मनपा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी व लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles