नगर,
ahmednagar iligal gas refiling नगर शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये घरगुती वापरा करीता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करुन, सदर घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसाईक गॅस टाक्यांमध्ये रिफिंलींग करुन व्यवसाईक गॅस सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त केला. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली .
स्थागुशा पथकाने तात्काळ वारुळवाडी, ता. नगर परिसरात जावुन खात्री करता एका पत्र्याच्या शेडमध्ये 2-3 इसम हे लाल रंगाच्या गॅस टाक्यामधुन निळ्या रंगाच्या गॅस टाक्यामध्ये गॅस भरताना दिसुन आले. पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन 3 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सोहेल जाकीर शेख वय 29, रा. पाईपलाईन हाडको, एकविरा चौक, अहमदनगर, 2) विक्रमसिंह राजबहाद्दुर चव्हाण वय 35, मुळ रा. भटपुरवा उचाहाट, जिल्हा रायबरेली राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. वारुळवाडी, ता. नगर व 3) प्रल्हादसिंह पप्पुसिंह चव्हाण वय 20 मुळ रा. चुरेबोधीसिंह, ता. सलुन, जिल्हा रायबरेली राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. वारुळवाडी, ता. नगर असे असल्याचे सांगितले. यातील इसम नामे सोहेल शेख याचेकडे सदर व्यवसायाबाबत विचारपुस करता त्याने गॅस सिलेंडर रिफिलिंगचा व्यवसाय त्याचे स्वत:चे मालकीचा असुन घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरकाकडुन घेतल्याचे सांगितले. पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन 1,60,000/- रु.कि. एच. पी. कंपनीच्या घरगुती वापराच्या 80 रिकाम्या गॅस टाक्या, 1,24,000/- रु.कि. भारतगॅस कंपनीच्या व्यवसाईक वापराच्या 31 गॅस भरलेल्या गॅस टाक्या, 2,77,500/- रु.कि. भारतगॅस कंपनीच्या व्यवसाईक वापराच्या 111 रिकाम्या गॅस टाक्या, 14,000/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे 6 वजन काटे व 90000/- रु.किचे 6 गॅस सिलेंडंर रिफिलिंग मशिन व मोटार असा एकुण 6,65,500/- रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या व गॅस रिफिलिंग करीता आवश्यक असलेली साधने अशा मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, भारत व एच. पी. गॅस कंपनीच्या घरगुती व व्यवसाईक वापराच्या गॅस टाक्या रिफिंलिंग व साठा करुन ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द भिंगार कॅम्प पो.स्टे.गु.र.नं. 627/2024 भारतीय न्याय संहिता कलम 223, 287, 125 सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 सह एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमन कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
- Advertisement -