विद्यार्थ्यांनी गणितातील आपली आवड वाढवावी -अशोक कडूस
अहमदनगर (प्रतिनिधी)- विक्रम लोखंडे
अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थी, आदर्श मुख्याध्यापक, गुणवंत गणित शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ सल्लागार नाना लामखेडे, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित होते.
नाना लामखेडे यांनी मुलांना, पालकाना, शिक्षकाना व मुख्याध्यापकांना आपली भूमिका काय असावी? याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गणिती संकल्पना समजून घ्याव्यात. शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने संकल्पना स्पष्ट करू नये, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विविध उदाहरणाच्या सहाय्याने गणिताचे महत्व विषद केले. तर सर्व गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापकांचे कौतुक केले. तर गणितामधील पायची संकल्पना स्पष्ट केली.
शिक्षाधिकारी अशोक कडूस यांनी गणित हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट करुन गणित विषयाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. तर विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
दिनकर टेमकर यांनी विद्यार्थ्यांना गणितातील आपली आवड वाढवली म्हणजे त्याना पुढील शिक्षणात अडचण येणार नसल्याचा सल्ला दिला. तर शैक्षणिक जीवनातील व अधिकारी असताना गणित विषयाचे अनुभव कथन केले. मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार निक्रड यांनी परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यामध्ये गणिताची भिती कमी व्हावी, तर प्रज्ञावंत विद्यार्थी शोधणे हा असल्याचे सांगितले. मनपा शिक्षण मंडळाचे विषयतज्ञ अरुण पालवे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करुन गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी 10 स्कॉलरशिप मिळवलेले व 83 प्रज्ञावान विद्यार्थी, 15 आदर्श मुख्याध्यापक आणि 18 गुणवंत शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तर नवनाथ घुले यांचा आदर्श संघटक म्हणून सत्कार करण्यात आला. या सर्वांचा प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह शॉल तसेच विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची अध्यक्ष निवड अनिल वाकचौरे यांनी केली. त्यास सचिन सिन्नरकर यांनी अनुमोदन दिले. प्रास्ताविक मंडळाचे परीक्षाप्रमुख विष्णु मगर यांनी मंडळाच्या विविध परीक्षा त्यांचे स्वरूप व विविध उपक्रमांचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य प्रकाशन समिती प्रमुख नवनाथ घुले यांनी केले. आभार मंडळाचे साचिव राजेंद्र खेडकर यांनी मानले. यावेळी अविनाश बोंद्रे, बाळासाहेब निवडुंगे, राजेंद्र बारगुजे, शहाजी मुन्तोडे, दिलीपराव रणसिंग, कल्याण ठोंबरे, बाबासाहेब दौड, देविदास सातपुते, सचिन कर्डिले, अतुल पटवा, भरत लहाने, सच्चिदानंद झावरे, भाऊसाहेब इथापे, मयुर परदेशी, राजू पवार, भास्कर सुवर्णकार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.