अंजुमने तरक्की ए उर्दू (चांद सुलताना हायस्कूल) या संस्थेच्या चौकशी कामी दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्याचा इशारा.
शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने चौकशी समिती गठित करून चौकशी सुरू केली व त्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी आजपर्यंत करण्यात आली नसल्याचा आरोप – अल्ताफ जहागीरदार.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अंजुमने तरक्की ए उर्दू (चांद सुलताना हायस्कूल) या संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या चांद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या कर्मचारी नियुक्ती व शालेय व्यवस्थापनाच्या आणागोदि कारभाराबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानत याचिका क्र. ८६४७/२०२३ मध्ये दिलेले निर्देश अशा अंदाजे १०-१२ तक्रारीच्या चौकशी कामे शिक्षण अधिकारी यांनी चौकशी समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले आहे सदर समितीने फक्त २ एप्रिल २०२४ रोजी विषयांकित संस्थेच्या शाळेत येऊन चौकशी सुरू केली व त्यानंतर चौकशी समितीकडून उर्वरित प्रकरणापैकी कोणत्याही प्रकरणाची चौकशी आतापर्यंत करण्यात आलेली नाही.
सदर चौकशीच्या प्रगती बाबत माहिती घेण्यासाठी शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाच्या संपर्कात असताना संबंधित कार्यालयाकडून विषयांकित संस्थेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नसीर शेख व विद्यमान सदस्य हे शिक्षण अधिकारी कार्यालयात वारंवार येत असल्याची माहिती मिळत आहे व तसे निदर्शनासी आले आहे. विषयाकित संस्थेचे सदस्य गुंड प्रवृत्तीचे व राजकीय लागेबांधे वाले असल्याने चौकशी समितीतील अधिकारी व संबंधित अधिकारी यांना आर्थिक लाभाचे अमिषा पोटी चौकशी अहवाल शिफारशी संस्थेच्या हितात लाभात करून घेण्याचा प्रयत्न सदर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मार्फत होत असल्याची शंका संस्थेच्या विरोधातील तक्रारदारांच्या मनात निर्माण झाली आहे.
त्यास संस्थेच्या कर्मचारी शिक्षकांच्या आपापसातील कुजबूज व संस्थेच्या सदस्यांची शिक्षण अधिकारी कार्यालयातील वारंवारच्या उपस्थितीमुळे दुजोरा मिळत असल्याने शिक्षण अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून तक्रारीच्या पुराव्यानुसार व गुणवत्तेवर निपक्ष चौकशी करून स्पष्ट अहवाल येत्या ३० दिवसात सादर करण्यात यावे अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करून जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अल्ताफ जहागीरदार यांनी निवेदनात म्हटले आहे.